ल्युमिगॉनचा टीथ्री स्मार्टफोन रात्रीतही काढेल उत्तम फोटो

luimigon
डॅनिश कंपनी ल्युमिगॉनने त्यांचा नवा स्मार्टफोन टीथ्री सादर केला असून हा जगातील पहिला नाईट व्हिजन कॅमेरा असलेला फोन असल्याचा दावा केला आहे. अतिशय मस्त डिझाईन आणि युनिक फिचर्स मुळे हा फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. या स्मार्टफोनची किंमत आहे ५० हजार रूपये म्हणजे ७०० डॉलर्स. ४.८ इंची स्क्रीनचा हा फोन सध्या फक्त काळ्या रंगात उपलब्ध असून लवकरच तो पांढर्‍या व नारंगी रंगातही मिळणार आहे.

मरीन ग्रेड ३१६ स्टेनलेस स्टीलपासून या फोनची बॉडी बनविली गेली आहे. रात्रीच्या अंधारातही चांगल्या गुणवत्तेचे फोटो काढण्यासाठी त्याला ४ एमपीचा नाईट व्हिजन कॅमेरा दिला गेला आहे. या कॅमेर्‍याने व्हिडीओही घेता येणार आहेत. स्क्रीनला गोरिल्ला ग्लास फोर प्रोटक्शन दिले गेले आहे. हा फोन डस्ट व वॉटरप्रूफ आहे. त्याला ३ जीबी रॅम, अड्राईड ६.० मार्शमेलो ओएस, १२८ जीबी स्टोरेज, १३ एमपी/ ४ के चा रियर तर ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. कनेक्टिव्हीटीसाठी वायफाय, ब्ल्यूटूथ मायक्रो यूएसबी २.० पोर्ट अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment