भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार अॅमेझॉन

amazon
वॉशिंग्टन – भारतात आणखी तीन अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा निर्णय अमेरिकेतील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने घेतला आहे. भारतातील स्टार्टअप उद्योगाला या गुंतवणूकीमुळे चालना मिळेल, तसेच कल्पक आणि डिजिटल उद्योजकतेचे प्रमुख केंद्र म्हणून भारताचे स्थान आणखी मजबूत होईल, असा विश्वास अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी व्यक्त केला.

बेझोस यांनी ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात केली. त्यानंतर अॅमेझॉनकडून भारतात होणाऱ्या गुंतवणूकीचा आकडा आता पाच अब्ज डॉलरवर पोहचला आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जेफ बेझोस यांना आंतरराष्ट्रीय नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतात यावर्षी अॅमेझॉन ‘वेब सर्व्हिसेस क्लाऊड रिझन‘ स्थापन करणार असल्यामुळे भारतातील हैदराबाद येथे तयार होणाऱ्या अॅमेझॉनच्या अमेरिकेबाहेरील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग अँड डेव्हलपमेंट केंद्रात हजारोंची रोजगारनिर्मिती होणार आहे. अॅमेझॉनचा भारतातील विस्तार वाढला आहे. विशेषतः टपाल खात्याशी भागीदारी केल्यानंतर कंपनीला देशातील सर्वच शहरांमध्ये पोचण्याची संधी मिळाली, असेही बेझोस यांनी नमूद केले.

Leave a Comment