रोल्स राईसची डॉन कन्व्हर्टिबल भारतात येणार?

royce
ब्रिटीश मोटर उत्पादक कंपनी रोल्स राईस त्यांची महागडी, शानदार आकर्षक कार डॉन कन्व्हर्टिबल भारतात आणण्याचे संकेत मिळाले आहेत. लग्झरी कार बनविणार्‍या या कंपनीने एक नवे मॉडेल भारतात आयात केले आहे त्यावरून हा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीने आजपर्यंत बनविली गेलेली सर्वात सेक्सिएस्ट कार अशी तिची जाहिरात केली आहे. या कारची किंमत आहे सुमारे ३,९०,००० डॉलर्स.

सुमारे अडीच हजार किलो वजनाची ही कार सॉफट टॉप म्हणजे कन्व्हर्टिबल हुडची कार आहे. या कारसाठी ६.६ टिरचे व्ही १२ इंजिन ८ स्पीड झेडएफ ऑटो गिअर बॉक्ससह दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ही कार ५ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी २५० किमी. या कारचे टप २२ सेकंदात उघडते. कारचे इंटिरीयर खास केले असून कारमधील सीटही अत्यंत आरामदायी आहेत. यामुळे दीर्घ प्रवासातही प्रवासी सुखदायक प्रवास करू शकतात. शहरात ही कार लिटरला ५ किमीचे तर हायवेवर लिटरला १० किमीचे मायलेज देऊ शकते.

Leave a Comment