रेल्वेची जननी सेवा आजपासून सुरू

janani
दिल्ली – लहान मुलांसह प्रवास करणार्‍या महिलांना रेल्वे प्रवास सोयीचा व सुविधेचा व्हावा यासाठी रेल्वेच्या अर्थंसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलेली जननी सेवा आजपासून सुरू होत आहे. या सेवेचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होत आहे. या सेवेनुसार निवडक रेल्वे गाड्यांतून तसेच सर्व रेल्वे स्थानकांवर लहान मुलांसाठी दूध, गरम पाणी, बेबीफूड, चॉकलेट, बिस्कीटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

§oया योजनेनुसार झोनल रेल्वे तसेच आयआरसीटीसी या सर्व स्टॉलवर लहान मुलांसाठी आवश्यक खाद्यपदार्थ व पेये उपलब्ध असणे बंधनकारक केले गले आहे. रेल्वेच्या पँट्री कारमध्येही हे पदार्थ उपलब्ध असणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा पूर्ण करण्याचा धडाका लावला असून गेल्या दोन महिन्यात अनेक जाहीर योजना प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आल्याचे मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा अतिशय कुशलतेने रेल्वे मंत्रालय उपयोग करून घेत असल्याचे सांगून हे अधिकारी म्हणाले, कोणत्याही नव्या योजनेचा प्रारंभ रेल्वे मंत्री प्रत्यक्षात हजर न राहता व्हिडीओच्या माध्यमातून करत आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रम संबंधित स्टेशन प्रमुखांच्या उपस्थितीत केला जातो त्यामुळे वेळ वाचतो व योजना त्वरीत कार्यान्वित करता येते.

Leave a Comment