फेसबुकच्या एमडीपदी उमंग बेदी

umang-bedi
नवी दिल्ली- उमंग बेदी यांची सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने व्यवस्थापकीय संचालकपदी (भारत) नेमणूक केली असून जुलैमध्ये ते पदभार स्विकारतील. बेदी यांच्यावर देशातील महत्वाचे ग्राहक आणि प्रादेशिक संस्थांशी संबंध जोडून डावपेचात्मक संबंध विकसित करण्याची जबाबदारी असेल.

ते किर्तीगा रेड्डी यांची जागा घेणार असून अमेरिकेतील आपल्या मूळच्या पदावर रेड्डी परत जाणार आहेत. विक्री, मार्केटिंग आणि भागीदारी यातील तब्बल दोन दशकांचा अनुभव घेतलेले बेदी यांनी यशस्वीपणे काम केले आहे. फेसबुकमध्ये येण्यापूर्वी बेदी हे अ‍ॅडोबच्या दक्षिण आशिया विभागाचे व्यवस्थापकीय संचालक होते. अमेरिकेनंतर फेसबुकचा सर्वाधिक वापर भारतात केला जातो. भारतात दरमहा सुमारे १५० मिलियन अॅक्टिव यूजर्स आहेत.

उमंग बेदी यांनी पुणे यूनिव्हर्सिटीमधून इंजीनियरिंगची पदवी घेतली असून हार्वर्ड बिजनेस स्कूलचे ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांना २०१४ मध्ये भारतीय हॉटेस्ट बिजनेस लीडर अवॉर्ड ‘४० अंडर ४०’ मे गौरवण्यात आले आहे.

Leave a Comment