लोंबार्गिनीची देखणी सेस्टो एलिमेंटो कार

elemento
आलिशान गाड्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोंबार्गिनीची सेस्टो एलिमेंटो कार कारप्रेमींमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे. विशेष म्हणजे लोंबार्गिनी व बोईंग या कंपन्यांनी मिळून या कारची निर्मिती केली आहे. अतिशय देखण्या लूकच्या या कारमध्ये कार्बनचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. कारमधील बहुतेक सर्व पॅनल्स, क्रॅश ब्रोक्सेज, पॅसेंजर सेल, चाके यातही कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे. या मॉडेल्सची केवळ २० युनिट बनविली गेली आहेत. तिची किंमत आहे १२ ते १७ कोटी रूपये.

कारचे शार्प हेडलँपस, बाय जेनॉन लॅम्पस चार एलईडी लाईटस तिला अधिक शानदार बनविण्यास कारणीभूत ठरले आहेत. या कारसाठी ५.२ लिटरचे व्ही १० इंजिन दिले गेले असून ती ० ते १०० किमीचा वेग केवळ २.५ सेकंदात घेते. कारचा टॉप स्पीड आहे ताशी ३५० किमी. ही कार आतून कॉम्पॅक्ट आहे आणि कारमध्ये प्रत्यक्षात सीट्स नाहीत. कारच्या कार्बन फायबर टबमध्येच पॅडस अॅटाच करून सीट बनल्या आहेत. कारचे इंजिन ५२०४ सीसीचे आहे. ही कार सर्वप्रथम पॅरिस कार शोमध्ये २०१० मध्येच सादर केली गेली होती.

Leave a Comment