रेपो रेट ‘जैसे थे’

rbi
मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज पुन्हा रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट ६.५० टक्‍क्‍यांवर आणि रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर) ४ टक्‍क्‍यांवर कायम ठेवले आहे.

त्रैमासिक पतधोरण आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जाहीर केले असून व्याजदरकपातीबाबतचा विचार यापुढील काळात मॉन्सूनची प्रगती आणि विविध आर्थिक घडामोडी विचारात घेऊन पुढील पतधोरण आढाव्यात केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी एप्रिलमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केल्यामुळे सध्याची महागाईची आर्थिक स्थितीचा विचार करून व्याजदरांबाबत निर्णय घेतल्याने सध्याच्या स्थितीचा विचार करता दर “जैसे थे‘ ठेवणे योग्य असल्याचे स्पष्टीकरण राजन यांनी दिले.

Leave a Comment