पोलका डॉटस – एव्हरग्रीन फॅशन

polka
प्रत्येक सीझनप्रमाणे फॅशनचे रंग बदलत असतात. तसेच कांही काळानंतर कांही फॅशन्स आऊटडेटही होतात. पोलका डॉट ही फॅशन मात्र तिची लोकप्रियता कायम राखण्यात यशस्वी ठरली असून कोणत्याही सीझनसाठी, कोणत्याही वयासाठी आणि कोणत्याही वेळेसाठी ती एकदम खास आहे. पोलका डॉट म्हणजे सर्वत्र एकसारखे गोळे असलेले. कांही काळापूर्वी फक्त कपड्यांवर असलेले हे पोलका डॉटस आता फॅशनसाठी वापरल्या जाणार्‍या अन्य अॅक्सेसरीजवरही विराजमान झाले आहेत आणि तेही लोकप्रिय ठरले आहेत.

polkadot
पोलका डॉटस प्रिटच्या कपड्यांबरोबरच बांगड्या, ब्रेसलेट, दागिने, बूट, चप्पल, पर्सेस अगदी गॉगल्सच्या फ्रेमवर ही दिसून येत आहेत. आजकाल काळा, नेव्ही ब्ल्यू पोलकाला अधिक पसंती दिली जात असली तरी लाईट कलर पोलका डॉटसही त्यांची क्रेझ कायम राखून आहेत. बॅाटल ग्रीन, यलो, चॉकलेटी ब्राऊन हे रंगही भाव खाऊन जात आहेत.

पोलका डॉट्स केवळ विविध कपड्यांवरच नाही तर साड्यांमध्येही लोकप्रिय फॅशन प्रकार आहे. लग्न, पाट्यार्ंत युवती वर्ग आवर्जून या पोलका डॉट्स साड्यांची जादू बिखरवितो आहे. साडी प्लेन व काठ पदरावर पोलका डॉटस अशी फॅशनही जोरात आहे. स्टायलीश लूक व मॉडर्न ड्रेस असे कुठेही ते वापरले जातात. कोणत्याही कार्यक्रमात पोलका डॉट्स हिटच होतात असाही अनुभव येत आहे. फॅशन तज्ञांच्या मते कोणत्याही वयाच्या महिलांना पोलका डॉटस कपडे शोभतात व कुठेही कधीही ते वापरता येतात यामुळे त्यांची लोकप्रियता कायम आहे.

Leave a Comment