टू व्हिलरच्या किंमतीचा हेडफोन भारतात लॉंच

headphone
मुंबई : एका कंपनीने भारतात एक हेडफोन लॉंच केला असून या हेडफोनचे नाव एचडी ६३० व्हीबी असे असून, त्याची किंमत चक्क टू व्हिलरच्या किंमती एवढी म्हणजेच ४० हजार रुपये इतकी आहे.

एवढा चाळीस हजाराचा हेडफोन म्हटल्यावर कोणाचेही कान उभे राहू शकतात. पण हे खरे आहे. हा हेडफोन सिनहायजर नावाच्या कंपनीने लॉंच केला आहे. विशेष म्हणजे भारतात मिळणाऱ्या बहूतांश बाईकची किंमतही चाळीस हजारच असल्यामुळे अनेकांनी हेडफोनची किंमत पाहून डोळे विस्फारले आहेत. मात्र, कंपनीने या हेडफोनची किंमत ही ३९,९९९ रूपये इतकी असल्याचे म्हटले आहे.

याबाबत कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, आधुनिक तंत्रज्ञानावर हा हेडफोन हा पूर्णपणे आधारित असून, हा वापरल्यास ऐकणाराला एक अत्युच्च दर्जाची अनुभूती येईल. हा हेडफोन पूर्णपणे व्यत्ययविहीन ( Noise Isolating) असा आहे. हा हेडफोन हाताळण्यासही अत्यंत सोपा असून, मजबूत व दणकट असा असल्यामुळे ग्राहकाला तो वापरताना विशेष काळजी करण्याचे कारण नाही.

या हेडफोनबाबत बोलताना कंपनीचे डायरेक्टर कपील गुलाटी म्हणाले, अतिउच्च दर्जा असलेला आणि उत्कृष्ट साऊंड क्वालीटी असलेला हेडफोन आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नरत होतो. अखेर आमच्या कंपनीने सखोल अभ्यास करून एचडी ६३० व्हीबी बनवला आहे. हा हेडफोन ग्राहंकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वासही गुलाटी यांनी व्यक्त केला.

Leave a Comment