एअरबस चे थ्रीडी प्रिटींग टेक्नॉलॉजी मिनी विमान थॉर

thor
गेल्याच आठवड्यात बर्लीन येथे पार पडलेल्या एअर शोमध्ये बड्याबड्या विमानांच्या गर्दीतही एक छोटेसे विमान लोकांचे आकर्षण बनले. थॉर नावाचे हे मिनी विमान एअरबस कंपनीने थ्रीडी प्रिंटींग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविले असून जगातले या प्रकारचे हे पहिलेच विमान आहे.

या विमानाला एकही खिडकी नाही. २१ किलो वजनाचे हे विमान लांबीला ४ मीटर आहे. हे एकप्रकारचे ड्रोनच आहे मात्र त्याला विमानासारखा पूर्णपणे पांढरा रंग आहे. ते उडतेही विमानासारखेच. हे पायलटरहित विमान अनेक दृष्टीने खास आहे. कारण थ्रीडी प्रिटींग तंत्रज्ञानाचा वापर यात यशस्वी झाल्यामुळे मोठ्या विमानांसाठीही हे तंत्रज्ञान वापरण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे तज्ञांचे मत आहे. शिवाय या मुळे विमानबंाधणीसाठी लागणारा वेळ व खर्चही कमी होणार आहे.

थॉर च्या टीम इनचार्ज देतलेव कॉनिर्गोस्की यांच्या मते थ्रीडी प्रिटींग तंत्र हे काय आहे याची ही नुसती झलक आहे. अर्थात विमानातील इलेक्ट्राॅनिक्स थ्रीडी ने तयार केलेले नाहीत. थॉर मस्त उडते आणि हवेतही स्थिर राहते. एअरबसने त्यांच्या जेट ए ३५० विमानांसाठी तसेच बोईंगने त्यांच्या बी ७८७ ड्रीम लायनरचे सुटे भाग बनविण्यासाठी यापूर्वीच थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

Leave a Comment