आयपीएल-९ मध्ये सोनीने कमावले १२०० कोटी

ipl
नवी दिल्ली – आयपीएलच्या नवव्या हंगामात ब्रॉडकास्टर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन)ने १२०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. आयपीएल ८ हंगामामध्ये सोनीला १ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले होते. आयपीएलचे विशेष प्रसारण हक्क असणा-या सोनी पिक्चर्स नेटवर्कचे प्रसारण सेट मॅक्स, सोनी सिक्स आणि सोनी ईएसपीएन चँनलवर करण्यात येते. आमच्या उत्पन्नामध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाहिरातींच्या दरामध्ये बदल केल्याने यामध्ये वाढ केल्याने हा परिणाम पहायला मिळाला असल्याचे, एसपीएन इंडियाचे अध्यक्ष रोहित गुप्ता यांनी माहिती देताना सांगितले. एसपीएनने चालू हंगामात जाहिरातीच्या दरात १५ टक्क्यांनी वाढ केली होती.

Leave a Comment