आता नव्या लूकमध्ये अवतरणार नॅनो

tata
नवी दिल्ली : आता नव्या लूकमध्ये टाटा कंपनीची आणि सर्वसामान्यांची नॅनो कार अवतरणार असून टाटाच्या नव्या हॅचबॅक टियागोशी मिळतीजुळती ही नवीन नॅनो असल्याचे सांगण्यात येत आहे.

टाटा कंपनीने सर्वांत स्वस्त नॅनो कार बाजारात आणून अनेकांची इच्छा पूर्ण केली होती. आता ही गाडी नव्या लूकमध्ये अधिक आकर्षक स्वरूपात ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. ही कार बाजारात ‘पेलिकन’ या नावाने आणली जाणार आहे. नवीन नॅनो कारमध्ये आतून व बाहेरून पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. यामध्ये टियागो कारसारखे डॅशबोर्ड वापरण्यात आले आहे. तसेच स्टेअरिंग व्हीलवर ऑडियो व टेलीफोन कंट्रोल, टचस्क्रीन, 3 सिलेंडरचे इंजिन यासोबत अनेक बदल करण्यात आले आहेत. कारची किंमत २.५ ते ३.५ लाखांपर्यंत असणार आहे.

Leave a Comment