स्वित्झर्लंडच्या नागरिकांनी नाकारला फुकटचा पैसा

swiss
वयस्क तसेच बेरोजगारांना सरकारतर्फे कांही ठराविक रक्कम दरमहा दिली जावी वा नाही यासाठी स्वित्झर्लंडमध्ये नुकतेच सार्वमत घेण्यात आले असून त्यात नागरिकांनी असा फुकटचा पैसा नाकारण्यास प्राधान्य दिले असल्याचे समजते. या विषयावर सार्वमत घेणारा स्वित्झर्लंड पहिलाच देश आहे. यात ७८ टक्के नागरिकांनी सरकारचा फुकट पैसा नको असल्याच्या बाजूने मतदान केले आहे.

यात कमाई करत असलेल्या अथवा कमाई नसलेल्या वयस्क नागरिकांना कोणत्याही अटींशिवाय सरकारतर्फे दर महिना कांही ठराविक रक्कम देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला पाठिंबा देणार्‍यांनी वयस्करांना दर महा २५०० स्विस फ्रँक दिले जावेत अशी शिफारस केली होती. मात्र अन्य नागरिकांनी आजकाल माणसांपेक्षा मशीन्स कामे जास्त करतात व त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी झाल्याचे मत नोंदवत असा फुकटचा पैसा सरकारकडून नको असे मत दिले. स्वित्झर्लंडमधील राहणीमान महाग असल्याने असा प्रस्ताव दिला गेला होता.

Leave a Comment