डब्ल्यूएचओला इबोलावर नियंत्रण मिळवण्यात यश!

who
मुंबई : जागतिक आरोग्य संस्था (डब्ल्यूएचओ)ने जगाला हदरवून सोडणाऱ्या इबोला या महारोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचा दावा केला असून आफ्रिकेतील गिनीमध्ये इबोलावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची घोषणा डब्ल्यूएचओने केली. गिनी हा पश्चिम आफ्रिकेतील देश असून २०१४ साली इबोलाने प्रभावित झालेल्या तीन देशांपैकी एक आहे.

याबाबत संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या देशातील एका नागरिकाची ४२ दिवसांपूर्वी दुसरी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्या व्यक्तीचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ते म्हणाले की, डब्ल्यूएचओकडून गिनी या देशाला ९० दिवसांसाठी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश इबोलाच्या संक्रमणावर उपाय शोधणे आहे. या देखरेखीनुसारच लाइबेरियाला ९ जून रोजी इबोला मुक्त घोषित करण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओच्या रिपोर्टनुसार, २०१४मध्ये सुरु झालेल्या या महामारीमुळे गिनी, लाइबेरिया आणि सिएरा लिओनमधील २८,६३७ नागरिकांना इबोलाची लागण झाली होती. यापैकी ११,३१५ जणांचा मृत्यू झाला होता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment