रिलायन्सचा फक्त ३९९९ रूपयात ४ जी स्मार्टफोन

reliance
मुंबई : मोबाईल क्षेत्रात पुन्हा एकदा रिलायन्सने धमाकेदार पुनरागमन केले असून अवघ्या ३९९९ रूपयांना मिळणारा स्मार्टफोन रिलायन्सने लॉंच करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा स्मार्टफोन ४जी असून, लाईफ फ्लेम ६ असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे.

दरम्यान, लाईफ फ्लेम ६ हा फोन लॉंच करण्यापूर्वी रिलायन्सने एक आठवडाआधीच याच सीरिजचे दोन स्मार्टफोन लॉंच केले आहेत. फ्लेम ३ आणि फ्लेम ४ अशी त्या स्मार्टफोनची नावे आहेत. दरम्यान, नुकताच लॉंच करण्यात आलेला लाईफ फ्लेम ६ नवा कोरा स्मार्टफोन कंपनीच्या संकेतस्थळावरही लिस्ट करण्यात आला आहे.

रिलायन्सचा लाईफ फ्लेम ६ हा स्मार्टफोन संकेतस्थळासोबतच स्टोअर्समध्येही उपलब्ध असणार आहे. रिलायन्स डिजीटल आणि डिजीटल एक्सप्रेस या स्टोर्समध्ये हा मोबाईल विक्रीला असणार आहे. भारतातील सर्वात स्वस्त ४जी स्मार्टफोनच्या यादीत या मोबाईलचा समावेश झाला आहे. दरम्यान, इतक्या बलाढ्य आणि त्यातही भारतीय कंपनीने इतक्या स्वस्तात तोही ४जी स्मार्टफोन लॉंच करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ आहे. या फोनला ग्राहक उत्तम प्रतिसाद देतील असे, रिलायन्सच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

Leave a Comment