फॉक्सवॅगनची नवी अ‍ॅमिओ कार भारतात लॉन्च

volkaswagen
नवी दिल्ली: जर्मन कंपनी फॉक्सवॅगनने आज भारतात त्यांची नवी अ‍ॅमिओ कार लॉन्च केली असून या कारची शोरूम किंमत ५.२४ लाख रूपये ते ७.०५ लाख रूपये इतकी आहे. ही कार कंपनीने खासकरून भारतीय बाजारपेठेसाठी आणि भारतीय ग्राहकांचा विचार करून तयार केली आहे.

महाराष्ट्रातील चाकण येथील प्लांटमध्ये फॉक्सवॅगन अ‍ॅमिओ ही कार तयार करण्यात आली असून कंपनीची ही पहिली अशी कार आहे, ज्याची ८० टक्के निर्मिती भारतात करण्यात आली आहे. या कारमध्ये १.२ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारच्या विकासासाठी कंपनीने ७२० करोड रूपये इनव्हेस्ट केले आहेत. फॉक्सवॅगन अ‍ॅमिओला प्रसिद्ध हॅचबॅक पोलोच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ही कार १.२ लीटर एमपीआय पेट्रोल आणि १.५ लीटर डिझल इंजिनमध्ये उपलब्ध असणार आहे. त्यासोबतच गाडीमध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ७ स्पीड डिएसजी गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

फॉक्सवॅगन अ‍ॅमिओच्या फ्रंटवर नजर टाकली तर ही कार पोलोसारखीच दिसते. पण फॉक्सवॅगन अ‍ॅमिओमध्ये नवे हेडलॅम्प, स्पोर्टी बंपर, हॉरिजॉन्टल फॉग लॅंम्प लावण्यात आले आहेत. कारमध्ये प्रिमिअम क्वालिटी मटेरिअल वापरण्यात आले आहे आणि स्टाईल व कम्फर्टवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. तर लेदर लावलेले मल्टी फंक्शन स्टीअरींग देण्यात आले आहे. फॉक्सवॅगन अ‍ॅमिओमध्ये रेन सेंसिंग वायपर, ऑटोमॅटिक एसी, क्रूज कंट्रोल आणि टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम दिले गेले आहे. सेफ्टीसाठी कारमध्ये ड्युअल एअरबॅग, एबीएस, रिअर व्ह्यू कॅमेरा, पार्किंग सेंसर, लेन चेंज इंडिकेटर, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅंटी-थेफ्ट इमोबिलायझर आणि डिफॉगरला स्टॅंडर्ड फिचरमध्ये सामिल करण्यात आले आहे.

Leave a Comment