पेपर रोबो अँड्राईड प्लॅटफॉर्मनुसार चालणार

pepper
जपानमध्ये अतिशसॉफ्टय लोकप्रिय ठरलेला पेपर रोबो आता गुगलच्या अॅड्राईड प्लॅटफॉर्मनुसारही कार्यरत होणार आहे. त्या संदर्भातला एक करार गुगल आणि रोबो तयार करणार्‍या सोफ्टबँक कंपनीत करण्यात आला आहे. त्यानुसार माणसाच्या भावना समजून घेणारा व त्याच प्रकारे आपल्या शारिरीक हालचाली करणार्‍या या रोबोचा विकास करण्यासाठी गुगल मदत करणार आहे. त्यासाठी नवीन अॅप विकसित करण्यात येणार असल्याचे समजते.

हा पेपर रोबो जपानमध्ये वेटर, सेल्समन, ग्राहक सेवा प्रतिनिधी अशा स्वरूपात सध्या वापरला जात आहे व नेस्ले, निस्सान, मिझुकी बँक यासारख्या सुमारे ५०० कंपन्यांत त्याचा वापर केला जात आहे. गुगल या रोबोटवर अँड्राईडच्या सहाय्याने कांही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी मदत करणार आहे. या रोबोची सध्या मिनिटाला १ हजार युनिट विकली जात आहेत असेही सांगितले जात आहे. चार फुट उंचीच्या या रोबोसाठी २० बॅटर्‍या वापरल्या गेल्या आहेत. त्याची किंमत १ लाख ९८ हजार येन म्हणजे १८०० डॉलर्स आहे. हा रोबो सध्या उत्पादनापेक्षाही कमी किमतीत म्हणजे तोट्यातच विकला जात आहे. अँड्राईड विकसित रोबो छातीत लावलेल्या टॅबलेटच्या माध्यमातून काम करणार आहे.

Leave a Comment