डाटाविंडटची जबरदस्त ऑफर; केवळ १०० रूपयांत वर्षभर वापरा इंटरनेट

internet
मुंबई : हाताच्या बोटावर स्मार्टफोनमुळे जग आल्यापासून इंटरनेट हा अनेकांचा जीवनाचा अविभाज्य भाग झाला असून अनेकांसाठी जीव की प्राण असलेल्या याच इंटरनेटबद्दल एक खुशखबर आहे. ही खुशखबर ऐकून अनेकांना आनंद होणार आहेच. मात्र, अनेकांच्या खिशात बचतीचा पैसाही खुळखूळणार आहे.

इंटरनेटच्या माध्यमातून घर, प्रवास, ऑफिस जेथे जाईल तेथे हातातल्या फोन आणि लॅपटॉपच्या जोरावर जगाशी कनेक्ट रहायला अनेकांना आवडते. मात्र, याच इंटरनेटचे बील महिन्याच्या शेवटी जेव्हा हातात पडते तेव्हा अनेकजन नाके मुरडतात. महिन्याच्या शेवटी येणाऱ्या बिलापासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेकजण तर, इंटरनेटच बंद करण्याचा निर्णय घेतात. कारण या बिलाच्या रकमाही काहीशे आणि हजारांच्या घरात असतात. परंतु, आता तुम्हाला इंटरनेटच्या बिलाला घाबरण्याचे कारण नाही. डाटाविंड कंपनी मोबाईल युजर्सना अत्यंत माफक आणि कमी दरात इंटरनेट सेवा वापरायला मिळावी यासाठी प्रयत्न करत असून त्यासाठी कंपनीने वर्चुअल नेटवर्क ऑपरेटरसाठी अर्जही केला आहे.

जर डाटाविंडच्या या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर, अवघ्या १०० रूपयांत इंटरनेट वर्षभर वापरण्यास मिळणार आहे. ही सुविधाही डाटाविंडच उपलब्ध करून देण्यार असल्याचे सांगितले जात आहे. ही सेवा डाटाविंडने सुरू केल्यावर ग्राहकांना अवघ्या १०० रूपयांत वर्षभर इंटरनेट मिळणार आहे. तसेच, इंटरनेट बिलासाठी खर्च होणारा बराचसा पैसा वाचणारआहे. त्यामुळे आपोआपच ग्राहकांची आर्थिक बचत होणार आहे.

दरम्यान, या वृत्ताला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत सिंह तुली यांनीही दुजोरा दिला असून तुली यांनी दिलेल्या म्हटल्यानुसार, अजुनही देशातील १०० कोटी लोकं इंटरनेट सेवेपासून वंचित आहे. ग्रामीण भागात लोक इंटरनेटसाठी १२०० रुपये नाही गुंतवू शकत. म्हणूनच डाटाविंड कंपनीने मोबाइल वर्चुअल नेटवर्क ऑपरेटर योजनेत १०० कोटी रुपये गुंतवण्याची इच्छा वर्तवली असल्याचे तुली म्हणाले. हा प्लान यशस्वी झाल्यास डाटविंड फक्त १०० रुपयात वर्षभरासाठी इंटरनेट सेवा देणार आहे.

Leave a Comment