नवी दिल्ली- फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग याचे ट्विटर व पिंटेरेस्टवरील अकाऊंट हॅक झाले असून गेल्या आठवड्यापासून ट्विटर व पिंटेरेस्टवरील झुकेरबर्ग याची अकाऊंट हॅक करण्यात आली असून, त्यांची दोन्ही खाती आपण हॅक केल्याचा दावा आवरमाइन टीमने केला आहे.
झुकेरबर्गचे ट्विटर अकाऊंट हॅक
याबाबत आवरमाइन टीमने म्हटले आहे की, ट्विटरवरील झुकेरबर्ग याचे अकाऊंट हॅक करण्यासाठी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटच्या पासवर्डचा वापर केला आहे. झुकेरबर्ग यांनी इतर सोशल नेटवर्किंग साइटसाठी एकच युजरआयडी व पासवर्ड ठेवल्यामुळे त्यांची खाती हॅक करणे सोपे झाले. अशा पद्धतीने १०० मिलियन खातेधारकांची खाती हॅक केली होती. परंतु ती पुन्हा खातेधारकांना देण्यात आली आहेत. दरम्यान, फेसबुकच्या प्रणालीला कोणताही धोका नसल्याचा खुलासा फेसबुकच्या प्रवक्त्यांनी केला आहे.