फास्ट फूडचे अति सेवन धोक्याचे

fast-food
मुंबई : तुम्ही मोठ्या प्रमाणात जर का फास्ट फूडचे सेवन करीत असाल तर आताच सावधान व्हा ! तुमच्या हार्मोन्सवर याचे अधिक सेवन थेट आघात करू शकतात असा निष्कर्ष अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

हा निष्कर्ष विद्यापीठाच्या टीमने ८८०० जणांवर रिसर्च करून काढला असून २४ तासात जवळपास ३४% नागरिकांच्या कॅलरी झपाट्याने कमी झाल्याचे आढळले. तर 40 % नागरिकांच्या शरीरातील DiNP मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळले. शरीरातील DiNP वाढल्याने पेटलेट्स कमी होतात. तसेच शरीरात अॅसिडचे प्रमाण वाढून ते थेट हार्मोन्सवर आघात करत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. या संशोधनादरम्यान अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले असून फास्ट फूडचे सेवन मानवी शरिराला घातक आहे. ते थेट हार्मोन्सवर आघात करत असल्याचे दिसून आले, असे या रिसर्चला मार्गदर्शन करणारे विद्यापीठाचे प्राध्यापक अमी झोटा यांनी सांगितले.