जपानच्या हिराता यांना ९५ वर्षी मिळविली पदवी

degree
टोकियो – जगातील सर्वाधिक वयात पदवी मिळविणारे व्यक्ती जपानचे ९६ वर्षीय शिगेमी हिरात ठरले. क्योटोच्या विद्यापीठातून त्यांनी चिनी माती कलेत पदवीची परीक्षा पास केली. हिराता यांनी शुक्रवारी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून याचे प्रमाणपत्र देखील प्राप्त केले. या वर्षाच्या प्रारंभी हिराता यांनी युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट अँड डिझाइनमधून कला शाखेची पदवी प्राप्त केली होती. १९१९ मध्ये हिरोशिमात जन्मलेले हिराता पदवी प्राप्त केल्यानंतर परिसरात सेलेब्रिटी बनले आहते.

मी ज्या विद्यार्थ्यांची नावे जाणत नाही, त्यांनी देखील माझे अभिनंदन केल्यामुळे खूपच ऊर्जा मिळाली असे हिराता यांनी जपानच्या योमिउरी वृत्तपत्राला सांगिले. मी विक्रम बनविला नाही, माझे लक्ष्य 100 वर्षांपर्यंत जगण्याचे आहे. जर मी तंदुरुस्त असतो तर महाविद्यालयात जाणे खूपच मजेदार ठरले असते असे चिनी माती कलेच्या आपल्या अभ्यासक्रमाला 11 वर्षात पूर्ण करणारे हिराता यांनी म्हटले. दुसऱया महायुद्धात नौदलात काम करणाऱया हिराता यांनी मी आनंदी असून या वयात नव्या गोष्टी शिकण्यास सक्षम असणे आनंददायी असते असे सांगितले.

Leave a Comment