भारताचा विकसनशिल देशाचा दर्जा काढून घेतला

world-bank
नवी दिल्ली : भारतासाठी वापरला जाणारा उल्लेख विकसनशिल देशाचा दर्जा जागतिक बँकेने काढून आता त्या जागी दक्षिण आशियातील कनिष्ठ मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था असा दर्जा जाहीर केला आहे.

ही माहिती जागतिक बँकेचे सांख्यिकी विशेषक ताहीर खोखर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत समोर आली आहे. दक्षिण आशियाई राष्ट्र गटांत मोडणा-या भारताचा उल्लेख जागतिक बँक आजवर एक विकसनशिल राष्ट्र असाच करीत असे. मात्र आपल्या ताज्या अहवालात जागतिक बँकेने भारतावरील विकसनशिल राष्ट्राचा टॅग रद्द करीत भारताचा समावेश दक्षिण आशियातील कनिष्ठ मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्थांमध्ये केला आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक विकास निर्देशांकाच्या अहवालात कनिष्ठ मध्यम उत्पन्न गटातील अर्थव्यवस्थांचा समावेश विकसनशिल देशांत करणे बंद केले आहे. सर्वसामान्यत: भारताचा उल्लेख विकसनशिल राष्ट्रांतच होत असला तरीही सखोल विश्लेषणाच्या दृष्टीने भारताचा समावेश या नव्या वर्गीकरणात करण्यात आला आहे.

कारण सखोल विश्लेषणासाठी आणि सांख्यिकीय अभ्यासासाठी विकसनशिल देश अशी संज्ञा पर्याप्त ठरत नाही त्यामुळे या पुढील काळात आता भारताचा उल्लेख जागतिक बँकेच्या सर्व प्रकाराच्या विश्लेषणात्मक अहवालात कनिष्ठ मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्था असाच होणार आहे. कारण विकसनशिल देश या वर्गीकरणातील सर्वसामान्यीकरण विशेष अभ्यासाला मर्यादा पडतात. या गटातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत आहेत.

त्या बदलांची दखल घेण्यासाठी विश्लेषणात्मक स्तरावर वेगळी यादी करावी लागते. कारण विकसनशिल देशांच्या यादीत मलेशिया, मलावी अशा देशांचाही समावेश होतो मात्र त्यांची अर्थव्यवस्था प्रगतीचा टप्प गाठण्यापासून किती तरी दूर आहे. नव्या वर्गीकरणानुसार आता अफगाणिस्थान, बांगला देश आणि नेपाळ हे देश अल्प उत्पन्न गटात मोडतात. पाकिस्तान, श्रीलंका भारताप्रमाणेच कनिष्ठ मध्यम उत्पन्न गटात तर ब्राझिल, दक्षिण आफ्रिका आणि चीन वरिष्ठ मध्यम वर्गात मोडतात, असेही खोखर यांनी नमूद केले आहे.

Leave a Comment