उल्कापिंडातील धातूंपासून बनलीय ही कट्यार

dagger
इजिप्तचा प्रसिद्ध शासक तुतानखामेन याची ३३०० वर्षे जुनी कट्यार उल्कापिंडातील धातूंपासून बनविली गेल्याचे संशोधकांना आढळले आहे. या कट्यारीत लोखंडाबरोबरच उल्कापिंडात आढळणारे निकेल, कोबाल्ट, फॉस्फरस या धातूंचाही वापर केला गेल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे. इजिप्तच्या या लोकप्रिय फॅरोची ममी १०० वर्षांपूर्वी इजिप्तच्या वाळवंटात सापडली तेव्हा त्या पिरॅमिडमध्ये तुतानखामेनच्या ममीसोबत ही कट्यार व अनेक मौल्यवान वस्तूही सापडल्या होत्या.

ही कट्यार तेरा इंच लांबीची असून तिचे म्यान सोन्यापासून बनविले गेले आहे. कैरो संग्रहालय, पिसा विद्यापीठ व अन्य संस्थांच्या संशोधकांनी या कट्यारीचे एक्सरे परिक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे. प्राचीन इजिप्तमध्ये धातूंचा वापर अतिशय कौशल्याने केला जात होता तसेच कारागीरही कुशल होते असे इतिहास सांगतो. उल्कापिंडातील धातूंचा वापर करून हत्यारे बनविण्याची कला तेथील कलाकारांना अवगत होती असे सांगितले जाते.

Leave a Comment