उबेर फौजी- माजी जवानांसाठी देतेय कमाईची संधी

uber
ऑनलाईन कॅब सेवा देणार्‍या उबेरने लष्करातून निवृत्त झालेल्यांसाठी मानाने जगण्याचा हात पुढे केला आहे. ही कंपनी निवृत्त जवानांसाठी ड्रायव्हर व अन्य कामांसाठी जॉब देत असून उबेर फौजी असेच त्याचे नामकरण केले गेले आहे. गेल्या नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या पथदर्शी प्रकल्पात आत्तापर्यंत १० हजार निवृत्त जवानांना कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. उबेरने या साठी रक्षा मंत्रालयाच्या आर्मी वेलफेअर प्लेसमेंट संस्थेशी सहकार्य करार केला आहे.

लष्करातील आयुष्य तसे खडतर असतेच पण तेथे निवृत्तीही कमी वयात मिळते. यामुळे पुढचे सर्व आयुष्य पेन्शनवर जगण्याची वेळ येते. उबेरने लष्करातील निवृत्तांसाठी असाच एक प्रकल्प दोन वर्षांपूवी अमेरिकेत उबेर मिलीटरी नावाने राबविला व त्याला चांगले यश मिळाले. त्याच धर्तीवर त्यांनी भारतातही असा प्रयोग सुरू केला आहे. यात पेन्शनपेक्षाही अधिक कमाई जवानांना होत आहे. माजी सैनिकांना गाडी खरेदीची संधीही कंपनी देते. त्यात पगारातून गाडीचा हप्ता कापून घेण्याची व्यवस्था आहे. जवानांना येथे अनेक सुविधाही पुरविल्या जात आहेत. त्यात कामाचे तास सोईनुसार ठेवण्याची निवडही त्यांना दिली गेली आहे.

Leave a Comment