वैज्ञानिकांना दुर्मिळ आईनस्टाईन कड्यांचा शोध लावण्यात यश

eiensitne
लंडन : वैज्ञानिकांना साधारण १ हजार कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका दीर्घिकेत अगदी सममिताकार आईनस्टाईन रिंग्ज (कडी) सापडली असून हा परिणाम जास्त वस्तुमानाच्या दीर्घिकेमागे लपलेल्या दीर्घिकेमुळे दिसतो. आईनस्टाईनच्या कड्यांचे भाकीत हे साधारण सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताआधारे करण्यात आले होते. त्या दुर्मिळ असल्या तरी त्यांच्याबाबत बरीच उत्सुकता होती. कॅनरी बेटांवरील युनिव्हर्सिटी ऑफला लागुना व इन्स्टिट्यूट दा अ‍ॅस्ट्रोफिजिका दा कॅनरीज या संस्थेच्या वैज्ञानिकांनी शोधलेल्या या कड्यांना कॅनरीयन आईनस्टाईन कडी असे नाव देण्यात आले आहे.

आईनस्टाईन कडी हा दूरस्थ दीर्घिकेचा दृश्यविभ्रम असतो, ती दीर्घिका हा त्याचा स्रोत असतो. प्रकाशाचे विवर्तन झाल्याने म्हणजे तो वाकल्याने स्रोतापासूनचे प्रकाशकिरण कड्यासारखे दिसतात. प्रचंड वस्तुमानाच्या दीर्घिकेमुळे हे प्रकाशकिरण वाकतात. थोडक्यात दूरस्थ दीर्घिकेपासून आलेला प्रकाश वाकल्याने आपल्याला दिसणारी ती त्या दीर्घिकेची विकृत प्रतिमा असते. दीर्घिका भिंगामुळे प्रकाशकिरण वाकतात, त्यामुळे अवकाश व काळ यांची रचना बदललेली वाटते. यामुळे केवळ वस्तुमान असलेल्याच वस्तू आकर्षिल्या जातात.

असे नाही तर प्रकाशकिरणांचा मार्गही बदलतो. जेव्हा दोन दीर्घिका समांतर असतात तेव्हा दूरच्या दीर्घिकेची प्रतिमा वर्तुळाकार होते. त्यातील विकृतीकरण हे मूळ स्रोत असलेल्या दीर्घिकेतील असममितीशी निगडित असते. मार्गारिटा बेटीनेली यांना आईनस्टाईन कडी शोधण्याचा मान मिळाला आहे. त्यांनी चिलीतील टोलोलो वेधशाळेतील ब्लांको दुर्बिणीच्या डार्क एनर्जी कॅमे-याच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. अश्म बटू दीर्घिकेतील ता-यांची संख्या किती असावी याचा शोध घेतला जात असून त्यातून आईनस्टाईन कड्यांवर आणखी माहिती मिळेल. कॅनरीज येथील दुर्बिणीच्या ठिकाणी असलेल्या ओसिरिस वर्णपंक्ती मापीच्या मदतीने संशोधकांनी या कड्यांचे भौतिक गुणधर्म शोधण्यास सुरुवात केली आहे. कॅनॅरियाज आईनस्टाईन कडी ही आजपर्यंत शोधली गेलेली सममिताकार कडी आहेत.

Leave a Comment