विवाह जुळवणाऱ्या साईट्सवरून बंद होणार डेटिंग

dating
नवी दिल्ली: आज जगभरात अशा अनेक विवाह जुळवणारी संकेतस्थळे आहे, ज्यावरून डेटींग देखील केले जाते. त्यामुळे अशा संकेतस्थळाकडे डेटींग साईट म्हणूनही पाहिले जाते. पण आता डेटिंगला आळा बसणार असून आता अशा विवाह जुळवणाऱ्या वेबसाईट्सवर वादग्रस्त कंटेटही टाकला जाणार नाही. केंद्र सरकारने विवाह जुळवणाऱ्या साईट्सवरून होणा-या फसवेगिरीला रोखण्यासाठी काही नवीन मार्गदर्शक तत्वे बनवले असून या मार्गदर्शक तत्वांना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंजूरी दिली आहे.

ह्या वेबसाईट्स आता आयटी अ‍ॅक्टच्या अख्त्यारित आल्या असून या साईट्सवर यूजर्सला रजिस्ट्रेशन करण्यासाठी पॅनकार्ड, बॅंक अकाऊंट पासबुक, ड्रायव्हिंग लायसेन्ससोबतच या कागदपत्रांची सेल्फ अटॅस्टेड कॉपीही वेबसाईटला द्यावी लागेल, ज्यांना सरकारी विभाग ओळखू शकेल. कोणत्याही वेबसाईटवर तुमचे रजिस्ट्रेशन तुमच्याकडून दिल्या गेलेल्या ई-मेल आणि फोन नंबरवर व्हेरिपिकेशन कोड आल्यानंतरच होईल. अनेक विवाह जुळवणाऱ्या वेबसाईट्स ह्या २५ ते ३० वयोगटातील तरूणांमध्ये जास्त पॉप्युलर आहेत. साडे पाच कोटी लोक प्रत्येक महिन्याला अशा साईटसवर एकत्र येतात. ६९ टक्के पुरूष आणि ३१ टक्के महिला जोडीदार शोधण्यासाठी साईट्स सर्च करतात.

याबाबत एसोचॅमच्या रिपोर्टनुसार, या अशा विवाह जुळवणाऱ्या वेबसाईट्सचा बिझनेस आज दिड हजार कोटी रूपये इतका झाला असून हा बिझनेस २०१३ मध्ये साधारण ५२० कोटी इतका होता. प्रत्येक महिन्यात साधारण ५५ ते ५५ मिलियन लोक या साईट्स सर्च करतात. तेच प्रत्येक महिन्यात साधारण २५ लाख लोक या साईटसवर रजिस्ट्रेशन करतात.

Leave a Comment