आलिशान आणि महागड्या तसेच वेगवान गाड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पोर्शेची नेक्स्ट जनरेशन ९११ मालिका भारतात २९ जून रोजी सादर केली जात आहे. त्यात करेरा केब्रियोलेट, करेरा एस, टर्बो व टर्बो एस केब्रियोलेट यांचा समावेश आहे. या अलिशान सुपरकार अनेक अपडेटसह सादर केल्या जात असून त्यांच्या बाहेरच्या लूकमध्येही काही बदल केले गेले आहेत. या कार्स नवीन पॉवरफुल इंजिनासह येत आहेत. या कारच्या किमती १.४ कोटींपासून सुरू होत असून त्यात ३ कोटींपर्यंत आहेत.
पोर्शेची ९११ सिरीज भारतात २९ जूनला येणार
अर्थात ९११ सिरीजचे आयकॉलीक डिझाईन बर्याच अंशी तसेच ठेवले गेले असले तरी हेडलाईट, डे टाईम रनिंग लाईट, मागचा भाग यात थोडा बदल केला गेला आहे. मागे चार पॉईट रिअर ब्रेक लाईट दिले गेले आहेत. ७ इंची इंफोटेनमेंट डिस्प्ले, पोर्शे कम्युनिकेशन मॅनजमेंट सिस्टीमही दिली गेली आहे. त्यामुळे मोबाईल, स्मार्टफोन वायफाय कनेक्ट करता येतील तसेच आयफोन या सिस्टीमला जोडता येईल. अॅपल कार प्ले फिचरसह आयफोन कनेक्ट करण्याचा ऑप्शनही दिला गेला आहे. या कारला न्यू जनरेशन फ्लॅट सिक्स इंजिन दिले गेले आहे. करेरा एस साठी जादा पॉवरचे इंजिन आहे. तीन सेकंदात ही कार ० ते १०० किमीचा वेग घेते तसेच तीचा टॉप स्पीड आहे ३२० किमी.