‘जियो’च्या ४जी सिमकार्डची विक्री सुरू

reliance
नवी दिल्ली – ४जी साठी व्यावसायिक सेवा सुरू करण्यासाठी रिलायन्स जियो इन्फोकॉमने पहिले पाऊल उचललेले असून स्मार्टफोनसोबत सिमकार्ड विकण्यास जियोने मोठय़ा शहरांमध्ये सुरुवात केली आहे. याच्या माध्यमातून हाय स्पीड ब्रॉडब्रँड सेवा मिळणार असल्यामुळे ग्राहकांना पहिल्यांदाच जियो ४जी नेटवर्कचा वापर करता येणार आहे.

मागील सहा महिन्यामध्ये कंपनीने ही सेवा आपल्या कर्मचा-यांसाठी सुरू केली होती. जियोचे ४जी सिमकार्ड तीन महिन्यांसाठी मोफत अमर्यादित डेटा आणि व्हाईस सेवा ऑफरसह देण्यात येत असल्यामुळे रिलायन्स जियो तीन महिन्याच्या आतमध्येच आपल्या सेवेचे अनावरण करण्याची शक्यता आहे. या नवीन सेवेसह नवीन वेबसाईट जियो डॉट कॉमलाही सादर करण्यात आले आहे.

ग्राहक यावर स्वतः नोंदणी करून जियो मोबाईल कनेक्शन घेऊ शकतात. याच्यासह कंपनीने प्रत्येक कर्मचा-याच्या मदतीने १० ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. या लोकांना एलवायएफ स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. त्याच्यासह ४जी सिमकार्ड देण्यात येणार आहे.

Leave a Comment