जगातली महागडी फ्लाईट- भाडे केवळ ५३ लाख रूपये

etihad
एतिहाद एअरलाईन्सने जगातल्या सर्वात महागड्या प्रवासाची संधी प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे. या कंपनीने एअरबस ए ३८०-८०० विमानातून लंडन ते मेलबर्न रिटर्न प्रवास ५३.३० लाख रूपये आकारून करण्याची संधी प्रवाशांना दिली आहे. हा जगातला आत्तापर्यंतचा सर्वात महाग प्रवास आहे. पूर्वी विमानाच्या याच स्यूटमधून मुंबई ते न्यूयॉर्क रिटर्न प्रवासासाठी ५०.३८ लाख रूपये आकारले गेले होते.

या महागड्या स्यूटमध्ये ३ आलिशान खोल्या असून विमानाच्या पुढच्या भागात अपर डेकवर हा स्यूट १२५ चौरस फूट जागेत बनविला गेला आहे. यात प्रायव्हेट शेफ, बटलर यांची सेवा अंतर्भूत आहे. डबलबेडसह प्रशस्त बेडरूम सिटींगमध्ये आरामशीर कोचांसह २७ इंची फ्लॅट स्क्रीन लावला गेला आहे. स्वतंत्र शॉवररूमही दिली गेली आहे. या प्रवासात आबुधाबीत विमान बदलावे लागते तेथे प्रवाशांना एतिहादच्या फर्स्टक्लास वेटिंग रूम मध्ये आराम करता येणार आहे. प्रवाशांना पिक अप, ड्रॅाप हेल्परही दिले गेले आहेत. तिकीटे, टेबल बुकींग यासारखी कामे हे हेल्पर करणार आहेत.

Leave a Comment