जपानमध्ये जगातील सर्वात जुने हॉटेल

hotel
टोकियो : सर्वात जुने हॉटेल अशी नोंद म्हणून जपानमधील एका हॉटेलची झालेली असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १ हजार ३११ वर्ष जुन्या हॉटेलची दखल घेतली आहे. हे हॉटेल इसवी सन ७०५ पासून अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. या हॉटेलचे नाव ‘निसियामा ओनसेन केईउनकान’ असे असून एकाच कुटुंबाच्या ५२ पिढ्यांपासून हे चालत आलेले आहे. जपानच्या या हॉटेलचे गरम पाण्याचे झरे हे वैशिष्ट्य मानले जाते. हे गरम पाण्याचे कुंड हॉटेलच्या स्थापनेपासून येथे आहेत. ५२ हजार येन म्हणजे सुमारे ३१ हजार रुपये इतके प्रतिदिवशी हॉटेलचे भाडे आहे. पर्यटकांचा ओढा कायम या हॉटेलकडे असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment