इंडस्ट्रीयल स्मार्टसिटींत २२ लाख रोजगार उपलब्ध होणार

industry
दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडॉर स्मार्टसिटी योजनेतील चार इंडस्ट्रीयल स्मार्टसिटींच्या कामाची सुरवात झाली असून येत्या दोन वर्षात ही शहरे उभी राहतील असे समजते. या योजने अंतर्गत अशी २४ शहरे वसविली जाणार आहेत. काम सुरू झालेल्या चार शहरात २२ लाख जणांना रोजगारसंधी उपलब्ध होणार असल्याचेही सांगितले जात आहे. मालवाहतूक सुलभ व जलद होण्यासाठी १५०४ किमी लांबीचा रेल्वे फ्रेट कॉरडॉर बनविला जात असून त्यातील १०० ते १५० किमी भागात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर बनविण्याची ही योजना आहे.

दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट कार्पोरेशन तर्फे ही योजना राबविली जात असून या मार्गाचे २४ भाग केले गेले आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात ८ स्मार्टसिटी उभारल्या जाणार आहेत. पैकी चार शहरांचे काम सुरू झाले आहे.या आठ शहरात नोएडा, मणेसर, नीमराजा, धौलेरा, पीतमपूर, दीघी पोर्ट व शेंद्रा, पाली जोधपूर या आठ विविध राज्यातील शहरांचा समावेश आहे.

पहिल्या चार शहरांसाठी जमीन हस्तांतरणाचे काम सुरू झाले आहे. सप्टेंबरपासून तेथे प्लॉट दिले जातील. इंडस्ट्रीयल इमारतींचे काम पूर्ण करून तेथे २०१८-१९ पासून उत्पादन सुरू होईल त्याचबरोबर निवासी भागांचेही काम केले जाईल. ही सर्व शहरे आयटी बेस्ड असतील व कामावर जाताना कुणालाही १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागू नये याच प्रकारे त्यांची उभारणी केली जाईल असे कार्पोरेशनमधील अधिकार्‍यानी सांगितले. या चार शहरात गुजराथेतील धौलेरा येथे ८ लाख, उत्तर प्रदेशातील नॉएडा येथे १२ लाख, महाराष्ट्रातील शेंद्रा येथे साडेसात लाख तर मध्यप्रदेशातील उज्जैन येथे साडेचार लाख जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment