विद्यार्थ्यांसाठी एअर इंडियाची खास ऑफर

air-india
नवी दिल्ली – विद्यार्थ्यांसाठी भारतीय विमानसेवा कंपनी एअर इंडियाने एक खास ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. या ऑफरनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी देशांतर्गत विमान प्रवास फक्त ३५०० रुपयांपासून करता येणार आहे.

एअर इंडियाने ही खास ऑफर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी विमान प्रवास करता यावा यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. या ऑफरचा लाभ मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.

या ऑफरनुसार देशांतर्गत प्रवास करण्यासाठी एक हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांना ३५०० रुपये एवढे शुल्क लागणार आहे. तर, एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास ५५०० रुपये मोजावे लागणार आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत एअर इंडियातर्फे सुरु करण्यात आलेल्या या ऑफरचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यासाठी तिकिट १ जून पासून ३१ ऑगस्टपर्यंत बुक करता येणार आहे. तर विमान प्रवास १ जुलैपासून ३१ ऑगस्ट दरम्यान करता येणार आहे.

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे तिकिट बुकिंग करताना अॅडमिट कार्ड, परीक्षेचे हॉल तिकिट, अॅडमिशनची रिसिप्ट किंवा शैक्षणिक संस्थेचे फोटो आयडीची द्यावे लागणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी १८०००१८०१४०७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.

Leave a Comment