रागावर असे मिळवा नियंत्रण

ragg
रागीट माणसे कुणालाच नको असतात. अतिरागामुळे कार्याचा विनाश होतो. रागीटपणा तब्येतीसाठी बरा नाहीच. हे सारे खुद्द अतिराग येणार्‍या माणसांनाही मान्य असते. पण तरीही कळते पण वळत नाही अशी त्यांची अवस्था होते. राग हा जन्मापासूनच जडलेला विकार असल्याने अगदी तान्हुल्यापासून ते शंभरी गाठलेल्या शतकवीरापर्यंत सर्वांनाच राग येत असतो. आजकालची अतिवेगवान जीवनशैली, कामाचा ताण, टेन्शन्स यामुळे राग येण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. आणि हा राग निघतो, ज्यांचा काही दोष नाही अशांवरच. त्यात बहुतेक आपले मित्र, घरची मंडळी किंवा नातेवाईक असतात. अनेकना हा किंवा ही आपल्यावर का रागावले, आपले नक्की काय चुकले हेही ज्यांच्यावर राग निघतो त्यांना समजत नाही. राग येणे स्वाभाविक असले तरी रागावर नियंत्रण मिळविता येणे हेही तितकेच स्वाभाविक असायला नको का?

कसे मिळवता येते रागावर नियंत्रण? अहो अगदी साधे उपायही त्यासाठी पुरेसे ठरतात. फक्त तुमची इच्छाशक्ती हवी. सर्वात प्रथम राग येतोय म्हटले की आकडे मोजायला सुरवात करा. हा उपाय फार काळापासून सांगितला जातो.त्यात थोडीशी भर घाला व प्रत्येक आकडा मोजताना कांही तरी विनोदी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला आपोआपच हसू येईल व राग विसरला जाईल. राग येतोय असे वाटले की घरातच एखाद्या शांत जागी बसा. हसून घ्या, रडू येत असेल तर रडाही. राग विझतोय हा अनुभव येईल.

ऑफिस मधला दिवस त्रासदायक झाला तर आलेला राग घरी येताना घराबाहेर ठेऊन या. स्वतःबरोबर थोडा वेळ काढा. बॉडी मसाज करून घ्या किंवा शॉपिंग करा. ऑफिस टेन्शन विसरायला होतेय हे लक्षात येईल. शरीरिक हालचाली मुळे मेंदूत एन्डोर्फीन रसायन स्त्रवते. त्यामुळे चांगले फिलिंग येते. योगा, मेडिटेशन चाही उपयोग होतो. दीर्घ स्वसन ही मनाला शांतता देते. रागाकडे दुर्लक्ष कार्याचा प्रयत्न करा किंवा त्याचा सामना करा.

दुसर्‍यावर राग काढणे अगदीच सोपे असते. अशावेळी १ मिनिटभरच विचार करा. खोलीतून बाहेर पडा व परत खोलीत येताना आपल्याला कशामुळे राग येतोय त्या समस्येवर उपाय शोधायचा प्रयत्न करा. आपण कधीकधी रागावतोय ते क्षण रेकॉर्ड करा अथवा वहीत नोंदवा. कोणत्या गोष्टींचा आपल्याला नक्की राग येतोय हे कळले, तर त्यावर उपाय काढता येतो. आपण कधी खूप हसलो, ते आठवा. त्यामुळेही राग शांत व्हायला मदत होते. दारे आपटणे, आपल्याच लोकांवर जोरजोराने ओरडणे, आदळआपट करणे हा आपल्या समस्येवरचा उपाय नाही हे पक्के लक्षात ठेवा. तरीही रागावर नियंत्रण येत नसेल तर कौन्सिलरला भेटा.

आता हा कौन्सिलर आपला जवळचा मित्र, आईवडील, आपला जीवनसाथी किंवा आपला ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी व्यक्तीच असते हे आपोआपच तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी पैसे मोजून व्यावसायिक कौन्सेलरकडे जाण्याची अजिबात गरज नाही. पहाल करून एवढ?

Leave a Comment