मुंबईच्या रस्त्यांवरील शीतपेयांत आढळला घातक जीवाणू

ice
मुंबई : तुम्ही उन्हामुळे तापलेल्या शरीराला गारवा मिळण्यासाठी शीतपेयांना पसंती देत असाल तर जरा सावधानी बाळगा. तब्बल ९२ टक्क्यांपर्यंत ई कोलाय हा घातक जीवाणू मुंबईच्या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या थंड पेयांमध्ये आढळला आहे.

ई कोलायचे प्रमाण फेरीवाल्यांकडे असलेल्या पाण्यातही २६ टक्के एवढा आहे. सामान्यत: हा जीवाणू मानवी विष्ठेत आढळतो. ई कोलाय या जीवाणूच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो, जुलाब यासारखे आजार होऊ शकतात. हॉटेल्स, फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, डेअरी, मिठाईची दुकाने, बर्फाचे गोळेवाले, लस्सी-ताक विक्रेते आणि फास्ट फूड सेंटर्स यांची पाहणी करुन हा निष्कर्ष मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने काढला आहे. ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आला, त्या सर्वांवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई केली जात आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment