मारूती सुझुकी थ्री डोअर स्विफ्ट स्पोर्टस कार

swift
मारूती सुझुकीने त्यांची नेक्स्ट जनरेशन स्विफट स्पोर्टस कार लाँच करण्याची तयारी केली असून ही कार थ्री डोअर व फाईव्ह डोअर अशा दोन व्हेरिएंटमध्ये आणली जात आहे. मनेसर उत्पादन प्रकल्पाबाहेर या कारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे या कारसाठी १.४ लिटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन दिले गेले. या इंजिनचा वापर कंपनीच्या विटारा एक्समध्येही केला गेला आहे. ही कार भारतात लाँच होण्याची शक्यता मात्र फारच कमी असल्याचे सांगितले जात आहे. मलेशियात ही कार प्रथम लाँच केली जाणार असून तिच्या किंमती साडेसात ते आठ लाखांदरम्यान असतील असेही समजते.

भारतात सध्या या सेगमेंटमधील फिअॅटची पुंटो व व स्कोडाची फाबिया या कार्स आहेत. या दोन्ही कारना भारतात फार सफलता लाभलेली नाही. हे लक्षात घेऊन मारूती त्यांची ही स्पोर्टस हचबॅक भारतात आणण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. सेमी हॉट हचबॅक श्रेणीतील या कारला एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक ब्रेकींग सिस्टीम दिली गेली आहे. युवा वर्गाला ही कार आकर्षित करेल. कारचा टॉप स्पीड १९३ किमी आहे व ० ते १०० किमीचा वेग ती ८.७ सेकंदात घेऊ शकते. कारमध्ये म्युझिकसाठी ब्ल्ू टूथ सुविधा दिली गेली आहे.

Leave a Comment