भारतात दाखल झाली मर्सिडिज बेंजची जीएलसी ही शानदार कार लॉन्च

mercedes-benz
नवी दिल्ली: भारतात नुकतीच मर्सिडिज बेंज जीएलसी ही कार लॉन्च करण्यात आली असून ५० ते ५५ लाख रूपये या दरम्यान या शानदार आणि आलिशान कारची किंमत ठेवण्यात आली आहे. २००० सीसीच्या वर असलेल्या डिझर कारवर सरकारने बंदी घातली आहे, पण या कारवर या बंदीचा कोणताही परिणाम होणार नाही. लवकरच या कारचे पेट्रोल व्हर्जनही कंपनी लॉन्च करणार आहे.

ही कार अधिक शानदार, आरामदायक आणि आलिशान करण्यासाठी आणि बारीकसारीक गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ही कार कुणीही बघितल्यावर या कारच्या प्रेमात पडतील असे आकर्षक असे या कारचे डिझाईन करण्यात आले आहे.

कंपनी या कारचे लवकरच पेट्रोल व्हर्जन घेऊन येणार आहे. ज्यात १९९१ सीसी इंजिन असणार जे ३७० एनएममध्ये २४५ एचपीची पावर आऊटपुट देतात. मायलेजबद्दल बोलायचे तर फक्त ६.५ सेकंदात ही कार ०-१०० किमीपर्यंत जाऊ शकते. सोबतच २२२ किमी/तासाच्या वेगाने धावेल.

Leave a Comment