बीएसएनएलची ‘फ्री-टू-होम’ सेवा

bsnl
नवी दिल्ली : ‘ फ्री टू होम’ या नव्या सेवेची घोषणा सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने केली आहे. मोबाईल ग्राहक या सेवेंतर्गत आपले कॉल बीएसएनएलच्या लँडलाईनवर कोणत्याही शुल्काविना फॉरवर्ड करू शकणार आहेत. आपल्या घरातील किंवा कार्यालयातील बीएसएनएलच्या लँडलाईनवर ग्राहकांना आपल्या मोबाईलवर कॉल्स उचलण्याची मुभा देण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

ग्राहकाला या सेवेमुळे अनेक कॉल फॉरवर्ड प्रकल्पापैकी जसे कॉल डायव्हर्ट, कॉल डायव्हर्जन, व्हेन बिझी, संपर्क क्षेत्रात नसल्यास, फोन बंद असल्यास अथवा प्रतिसाद न दिल्यास कॉल फॉरवर्ड करण्याची सुविधा मिळणार आहे. ग्राहक यामधील कोणत्याही पर्यायाचा वापर करून सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 30 मे ला दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या सेवेची घोषणा केली होती.

Leave a Comment