फोर्ब्सच्या यादीत दोन भारतीय महिला

combo1
न्यूयॉर्क- दोन भारतीय महिलांचा अमेरिकेतील स्वबळावर पुढे आलेल्या सर्वाधिक श्रीमंत ६० महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

ही यादी फोर्ब्सने तयार केली असून भारतात जन्मलेल्या नीरजा सेठी आणि जयश्री उल्लाळ अशी त्यांची नावे आहेत. यापैकी नीरजा सेठी यांनी आपले पती भरत देसाई यांच्यासमवेत अमेरिकेत आयटी सल्लागार व आऊटसोर्सिंग कंपनी सिंटेलची स्थापना केली आहे. तर जयश्री उल्लाळ या अ‍ॅरिस्टा नेटवर्कच्या अध्यक्षा व सीईओ आहेत. सेठी यांना १६वे स्थान असून उल्लाळ या ३०व्या स्थानावर आहेत. या ६० महिलांची एकत्रित संपत्ती ५३ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. सेठी सध्या कॉर्पोरेट व्यवहार उपाध्यक्ष असून त्यांचे निव्वळ संपत्ती १ अब्ज १० कोटी डॉलर आहे.

Leave a Comment