सौदी अरेबियाची ‘उबेर’मध्ये अब्जावधींची गुंतवणूक

uber
रियाध – सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक फंडाच्या माध्यमामधून उबेर या टॅक्‍सी सर्व्हिस कंपनीमध्ये तब्बल साडेतीन अब्ज डॉलर्स गुंतविले जाणार असून कंपनीस या गुंतवणुकीमुळे पश्‍चिम आशियामधील आपला प्रभाव वाढविण्याची संधी मिळणार आहे. या कंपनीची सौदी अरेबियामध्ये सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांमध्ये तब्बल ८०% महिलांचा समावेश असून महिलांनी गाडी चालविण्यावर सौदी अरेबियामध्ये बंदी आहे.

कंपनीचे या गुंतवणुकीमुळे एकूण मूल्य ६२.५ अब्ज डॉलर्स इतके झाले असून उबेरच्या मुख्य कार्यकारी मंडळामध्ये या नव्या गुंतवणुकीच्या व्यवस्थापनासाठी कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या यासीर अल-रुमाय्यान यांचा समावेश करण्यात येणार आहे. पश्‍चिम आशियामध्ये उबेर कंपनी सध्या २५ कोटी डॉलर्स गुंतविणार असून या भागामध्ये जलदगतीने व्यवसायवृद्धी करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. या पार्श्‍वभूमीवर सौदी अरेबियाकडून झालेली ही गुंतवणूक कंपनीसाठी मोठे व्यावसायिक यश मानले जात आहे.

Leave a Comment