रघुराम राजन मुदतवाढ घेण्यास अनुत्सुक

rajan
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांचा कार्यकाल सप्टेंबरमध्ये संपत असून त्यांना या पदावर मुदतवाढ नको असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजन यांना अमेरिकेत परतायचे असून तेथील विश्वविद्यालयात अध्यापनाचे तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर संशोधन करायचे आहे..

राजन यांना मुदतवाढ देण्यावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच राजन यांनी पंतप्रधान मोदींचा विश्वास प्राप्त केला असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून सांगितले जात आहे. मोदी आणखी दोन वर्षांसाठी राजन यांना मुदतवाढ द्यावी अशा मताचे आहेत व तसे संकेतही त्यांनी दिले आहेत. अर्थमंत्री जेटली ही राजन यांना काढले गेले तर जगात चुकीचा संदेश जाऊ शकतो अशा मताचे आहेत. विशेष म्हणजे देशातील उद्योगपती तसेच जागतिक पातळीवर थिंक टॅक म्हणविले जाणारे तज्ञ यांनी राजन यांना समर्थन दिले असून ते जगातील सर्वत्तम अर्थशास्त्री असल्याचे मतही व्यक्त केले आहे.

Leave a Comment