जगातला सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा तयार

tunnel
स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगातून आरपार जाणारा जगातला सर्वाधिक लांबीचा आणि खोलीचा रेल्वे बोगदा तयार झाला आहे. ५७.१ किमी लांबीचा हा बोगदा आभियांत्रिकी कौशल्याचा अजोड नमुना मानला जात आहे कारण समुद्रसपाटीपासून ५४९ मीटर उंचीवरून गेलेल्या या बोगद्यात एकही वळण नाही. म्हणजे हा बोगदा अगदी सरळसोट आहे. या गोथर्ड बोगद्यामुळे झुरीच व मिलान या दरम्यानचा प्रवास कमी वेळात होणार आहे. पूर्वी हे अंतर कापायला लागणारा वेळ १ तासाने कमी होऊन २ तास ५० मिनिटांवर येणार आहे. या ट्रॅकवरून ताशी २५० किमी वेगाने रेल्वे प्रवास करू शकतील.

या बोगद्यासाठी १०.३ दशलक्ष डॉलर्स खर्च आला आहे. दोन हजार कामगार येथे गेली २० वर्षे काम करत होते. त्यात ९ जणांचा मृत्यू झाला असेही समजते. या बोगद्यात दोन सिगल ट्रॅक केले गेले असून जगातील कोणत्याही पर्वत रांगात असा सरळ ट्रॅक नाही. आल्प्स ट्रांझिट गोथर्ड एजी या स्विस फेडरल रेल्वेची उपकंपनी असलेल्या कंपनीने या बोगद्याचे काम केले आहे. या बोगद्यात लेव्हल क्रासिंगही नाही. या वर्षअखेर हा बोगदा पूर्ण क्षमतेने सुरू होईल तेव्हा त्यातून दररोज २६० मालगाड्या व ६५ प्रवासी रेल्वे गाड्या धावणार आहेत.

Leave a Comment