एलजीचा मॉड्युलर जी फाईव्ह सादर

modulr
मॉड्युलर इकोसिस्टीम व एलजी फ्रेंडस अॅक्सेसरीजसह एलजीने त्यांचा जी फाईव्ह फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. मॉड्युलर म्हणजे या फोनला वेगवेगळी मॅन्यूअल्स लावता येणार आहेत. त्यात एलजी कॅम प्लस नावाचे अॅड ऑन फिचर आहे. यामुळे कॅमेर्‍यासाठी फिजिकल बटण वापरता येणार आहे. शिवाय हे बटण वापरताना बॅटरीची क्षमताही ४००० एमएएच पर्यंत वाढविली जाणार आहे. हायफाय मॉड्युल पोर्टेबल डॅक म्हणून वापरता येईल. शिवाय एलजी ३६० व्हीआर हेडसेट, ३६० कॅम, रोलींग बॉट, टीम प्लॅटिनम, एच थ्री बाय बी अॅन्ड ओ प्ले, स्मार्ट कंट्रोलर, फ्रे डस मॅनेजर अॅक्सेसरीज या सुविधाही आहेत.

या फोनसाठी अँड्राईड ६.०.१ मार्शमेलो ओएस, ५.३ इंची क्यूएचडी डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने २०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १६ एमपीचा लेजर ऑटोफोकस रियर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स दिली गेली आहेत. फोनची किंमत आहे ५२९९० रूपये. फ्लिपकार्ट व रिटेल स्टोअर्समध्ये तो विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment