कावासाकीच्या बाईकवर घसघशीत डिस्काऊंट

kawasaki
नवी दिल्ली : जपानची मल्टीनॅशनल मोटारसायकल उत्पादक कंपनी कवासकीने आपल्या कावासाकी इआर-६ एन या बाइकवर घसघशीत डिस्काऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाईकवर तब्बल २५,००० हजार रुपयांचा डिस्काऊंट देण्यात येणार आहे. या बाईकची मुंबईतील एका शोरूममध्ये किंमत ५.३७ लाख रूपये ते ५.१२ लाख इतकी सांगितली जात आहे.

या बाईकमध्ये ६४९cc पॅरेलल ट्विन सिलेंडर, फोर-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. या इंजिनमध्ये फ्यू-ल इंजेक्टेड सोबत ७१.१bhp इतकी पॉवर निर्माण करण्याची क्षमता आहे. ही बाईक दिसायला अत्यंत आकर्षक व दणकट अशी असून, पाहताक्षणी ती लक्ष वेधून घेते. या बाईकला तरूणांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे मुंबईतील एका टूव्हिलर शोरूमच्या सेल्स अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, २०१४ मध्येच कावासाकीने ही बाईक लॉंच केली होती. तसेच, ही बाईक म्हणजे कावासाकीचीच दूसरी एक बाईक निंजा ६५० Sports Tourer रोडस्टरचे व्हर्जन आहे. दोन वर्षांपासून या बाईकला तशी चांगली मागणी आहे. मात्र, डिस्टाकऊंट ऑफरमुळे या मागणीत वाढ झाली असल्याचे बाईक डिलरचे म्हणणे आहे.

Leave a Comment