भारतीय बाजारात दाखल झाला मायक्रोमॅक्सचा युरेका युनिकॉर्न

micromax
नवी दिल्ली – मागील वर्षीच्या यशस्वी स्मार्टफोन मालिकेनंतर आता मायक्रोमॅक्सची उपब्रॅड असलेली YU युरेकाने आपला नविन युरेका युनिकॉर्न हा प्रमुख स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

‘अॅन्ड्रॉइड ऑन स्टेरॉइड’ या खास ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा हा स्मार्टफोन भारतीय बाजारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, संपूर्ण धातूने बनलेला हा स्मार्टफोन गर्द चंदेरी, गर्द सोनेरी तसेच ग्रॅफाइट रंगामध्ये ई-टेल फ्लिपकार्ट या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. याची किंमत १२,९९९ रू असून एका महीन्यानंतर सर्वत्र १४,९९९ रू या किंमतीत उपलब्ध होणार आहे. आगाऊ नोंदणी मंगळवारपासून सूरू झाली आहे.

कसा आहे ‘युरेका युनिकॉर्न’
याचा डिस्प्ले ५.५ इंचाचा एचडी असून त्याला अल्ट्रा थीन ब्लेझ्ड २.५D ग्लास देण्यात आली आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टम अॅन्डॉइड ५.१ लॉलिपॉप ‘अॅन्ड्रॉइड ऑन स्टेरॉइड’ आहे. यात १.८ Ghz ऑक्टाकोर मेडिया टेक हेलिओ पी १० प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ४ जीबी रॅम, ३२ जीबी इन्टरनल मेमरी, १२८ जीबी पर्यंत एक्सपान्डेबल आणि ३२ जीबी मेमरी सोशिअल ड्राइव्हसाठी देण्यात आला आहे. १३ मेगापिक्सेल LED फ्लॅशसह याचा रिअर कॅमेरा आणि फींगर सेन्सिबलसह ५ मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ड्यूअल सीम आणि ४जी सपोर्टेड आहे. त्याचबरोबर यात फींगरप्रींट सेन्सर सेल्फी कॅमेरा, ०.२ सेकंदात अनलॉक होण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. यात चार दिवसाची लाँग बॅटरी लाइफसह ४,००० MAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Leave a Comment