फक्त १०,००० रूपयात व्हिडिओकॉनचा ४जी स्मार्टफोन

videocon
नवी दिल्ली – आपला नविन ४जी तंत्रज्ञान युक्त Krypton3 V50JG हा स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणांच्या निर्मितीत अग्रगण्य असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीने बाजारात आणला आहे. तोही अगदी ग्राहकांना परवडेल अशा फक्त १०,००० एवढ्या कमी किंमतीमध्ये उपलब्ध होणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये एलइडी फ्लॅशसह सेल्फी कॅमेरा देण्यात आल्यामुळे तूम्ही कमी उजेडातही सेल्फीचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर ३,००० mAh बॅटरीसह वीस टक्के लवकर चार्जिंगची क्षमता आहे. व्हिडिओकॉनने नेहमीच ग्राहकांना अत्याधूनिक फिचर्स आणि नाविन्यपूर्ण डिझाईन देण्याचा प्रयत्न केला आहे. Krypton3 मध्येही देशी अवतारासह स्मार्टफोनला तंत्रज्ञानाच्या बाबत नव्या उंचीला नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. असे व्हिडिओकॉनचे व्यावसायीक प्रमुख जेरॉल्ड परेरा यांनी सांगितले.

कसा आहे व्हिडीओकॉनचा नवा ४ जी स्मार्टफोन
या डिस्प्ले ५ इंचाचा असून तो एचडी आहे. यात अँड्रॉईड ६.० ऑपरेटिंग सिस्टम आणि १.३ Hz कॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर २ जीबी रॅम, १६ जीबी इन्टरनल मेमरी, ६४ जीबी पर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल LED फ्लॅशसह आणि फ्रन्ट कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे. हा फोन ड्यूअल सीम आणि ४जी सपोर्टेड आहे.

Leave a Comment