पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ

petrol
नवी दिल्ली – आधीच महागाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या खिशावर आता आणखीन ताण पडणार असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. नवे दर मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत.

नव्या दरवाढीनुसार, २.५८ रुपयांनी पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर वाढ झाली असून २.२६ रुपयांनी डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर वाढ करण्यात आली असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महिन्याभरात दुस-यांदा वाढ झाली असून दोन महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे. यापूर्वी १६ मे रोजी पेट्रोल ८३ पैशांनी तर डिझेल १.२६ पैशांनी महागले होते. त्याचप्रमाणे ३० एप्रिल रोजी पेट्रोल १.०६ पैशांनी महागले होते तर डिझेल २.९४ पैशांनी महागले होते. तसेच ५ एप्रिल रोजी पेट्रोल २.१९ पैशांनी आणि डिझेल ९८ पैशांनी महागले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामधील तेलाच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यातील बदलांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे.

Leave a Comment