केदारनाथाला पुराचा धोका कायम

kedar
उत्तराखंडमधील चारधाम म्हणजे केदार, बद्रिनाथ, ,गंगोत्री जमुनोत्रीची यात्रा सुरू झाली असतानाच केदारनाथाला २०१३ प्रमाणेच प्रलंयकारी पुराचा धोका असल्याचा इशारा भूवैज्ञानिक आणि बांधकाम तज्ञांनी दिला आहे. २०१३ च्या पुरात ३ हजारांहून अधिक भाविकांना प्राण गमवावे लागले होते आणि केदारनाथ मंदिर परिसर दुकाने, धर्मशाळा व अन्य इमारतींसह पूर्णपणे धुवून निघाला होता. या पुरानंतर पुन्हा नव्याने सुरू झालेल्या बांधकामांमुळेच पुन्हा पुराचा धोका असल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे.

या परिसरातील मंदाकिनी आणि सरस्वती संगमावर नवीन घाट बांधला गेला आहे त्यामुळे मंदाकिनीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे डॉ.विक्रम गुप्ता यांनी केदारनाथ मधील कोणत्याच नदीवर बांध घालणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मंदिराजवळ पडलेली बांधकामे अजून हटविली गेलेली नाहीत तीही त्वरीत हटविली जायला हवीत. नवीन बांधकाम तर करूच नये कारण नद्यांचे पाणी अडविले तर पूराची दाट शक्यता आहे व त्यामुळे गतवेळेप्रमाणेच मोठी जिवित व वित्त हानी होण्याची संभावना आहे.

Leave a Comment