फ्लिफकार्ट आता मासिक हप्त्यावर देणार वस्तू

flipkart
नवी दिल्ली – आपल्या ग्राहकांना “No Cost EMI” हा नविन पर्याय ई कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फ्लिफकार्टने उपलब्ध करून दिला असून यामध्ये ग्राहकांना सुलभ खरेदीसह समान मासिक हप्त्याची सुविधा मिळणार आहे. कोणतेही अतिरीक्त दर यामध्ये आकारले जाणार नाहीत. त्याचबरोबर ग्राहकांसाठी शुन्य प्रक्रीया फी, शुन्य व्याजदर, आणि शुन्य डाऊन पेमेंट असणार आहे.

ग्राहकांची खरेदी खरोखरच परवडणारी आणि स्वस्त करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असून अनेक मोठ्या ब्रॅन्डनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. जसा काही वर्षापूर्वी कॅश ऑन डिलिव्हरीने बदल घडवून आणला होता, त्याचप्रमाणे हा पर्याय देखिल ऑनलाइन खरेदीमध्ये बदल घडवून आणणारा ठरणार आहे. असे फ्लिफकार्टच्या मयांक जैन यांनी सांगितले. कंपनीने बजाजच्या सहायाने ही सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ३ महीन्यापासून १२ महीन्यापर्यत कालावधीची सुविधा देण्यात आली आहे.

Leave a Comment