फेसबुकसोबत येस बँकेची भागीदारी

yes-bank
पुणे – फेसबुकबरोबर भारतातील खासगी क्षेत्रातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या येस बँकेने भागीदारी केली असून फेसबुक हा कामाच्या ठिकाणी व्यावसायिक दृष्टीकोन असून, कंपन्या याद्वारे अधिक उत्पादकीय, सक्षम आणि संलग्नपणे काम करु शकतात. फेसबुकच्या वैशिष्टय़ांच्या कर्मचा-यांनी अधिक वापर करावा, विविध ठिकाणच्या विविध टीमशी संवाद साधावा, हा या मागचा उद्देश आहे.

बँकेचे सीईओ राणा कपूर म्हणाले, नेहमीच तंत्रज्ञान आत्मसात करायला आणि सोशल मीडिया चॅनेल्सचा वापर करायला येस बँक तयार असते. संलग्नता आणि संकल्पनांची देवघेव या कामाच्या ठिकाणी प्रोत्साहन देणाऱया महत्वाच्या गोष्टी आहेत आणि येस बँकेला संलग्न वातावरणात दृष्टीकोन, धोरणात्मक आखणी आणि अंमलबजावणी करु देण्याची परवानगी कामाच्या ठिकाणी फेसबुक देते. संपूर्ण संस्थेअंतर्गत संवादात सुधारणा, व्यावसायायिक गुंतागुंतीत निर्णय देणे तसेच कामाच्या ठिकाणचे नाते दृढ करणे आणि बँकेच्या विविध टिममध्ये गुंतवणूक वाढणे यासाठी बँक फेसबुकचा वापर करेल, असेही ते म्हणाले.

Leave a Comment