पाक महिलांचे ट्राय बिटींग मी लाईटली कँपेन हिट

newbil
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सादर करण्यात आलेल्या नवीन बिलाबाबत पाकिस्तानातील महिलांनी दुर्गेचे रूप धारण केले असून ट्राय बिटींग मी लाईटली कँपेन सुरू केले आहे. त्यांच्या या कँपेनला सोशल मिडीयावरही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. यात डॉक्टरीपासून अन्य व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या महिलांसह अगदी सर्वसामान्य महिलांनीही या बिलाला आव्हान दिले असून अत्यंत धाडसी कॉमेंट केल्या आहेत.

नव्या बिलनुसार परंपरा व इस्लाम धर्मानुसार पतीने पत्नीला मारहाण करणे हा त्याचा हक्क असल्याचे म्हटले गले आहे. पाकिस्तानात यापूवीच हिजाब न घालणे, अनोळखी पुरूषांशी बोलणे, नवर्‍याचे न ऐकणे, मोठ्याने बोलणे, पतीच्या परवानगी शिवाय कुणालाही पैसे देणे, महिला नर्सने पुरूष रूग्णाची सेवा करणे, माध्यमिक शिक्षण कोएड शाळेत म्हणजे मुलामुलींच्या कॉमन शाळेत घेणे, फौजी बनणे, ,जाहिरातीत काम करणे, परदेशी पाहुण्यांचे स्वागत करणे यासारखे प्रकार महिलांनी करणे निषिद्ध मानले गेले आहे. त्यात पतीने पत्नीला मारहाण करणे हा त्याचा हक्क असल्याची भर पडली आहे मात्र याविरोधात सर्व थरातील महिला एकत्र झाल्या असून फहाद राज याने या महिलांच्या १२ फोटोंची सिरीज त्यांच्या वक्तव्यासह प्रसिद्ध केली आहे.

यातील कांही कॉमेंट अशा-
*माझ्यावर हात उचलला तर हात तोडून तुला अल्ला भरोसे सोडेन अशी आहे.
* अन्याय सहन करणार नाही, पुरूषांनी त्यांच्या शक्तीपेक्षा बुद्धीमत्तेने आम्हाला मागे टाकावे.
*आम्ही सूर्यासारख्या आहोत, हात लावाल तर जळून राख व्हाल.
* मला मारून तर बघ, तुझा सर्वनाश करेन.
* सात वर्षे मला गाडी चालविण्याचा अनुभव आहे. हात उचलशील तर त्याच गाडीखाली तुला चिरडेन.
* हात उचलून तर बघ, उद्याची सकाळ तू बघणार नाहीस.
*तू मला घरात मारलेस तर मी दहा जणांसमोर तुला हाणीन. तुझे आयुष्य बरबाद करीन व त्याची जबाबदारी तुझ्यावरच राहील.
*मारण्याऐवजी इतके प्रेम कर की मला नावडती गोष्टही तुझ्यासाठी मी करेन.

या धाडसी कॉमेंटना सोशल मिडीयावर प्रचंड प्रतिसाद येतो आहे. पंजाब सरकारने आणलेले हे नवे बिल १६३ पानी असून त्यात महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले गेले आहेत.

Leave a Comment